1499 अहवाल प्राप्त, 211 पॉझिटिव्ह, 179 डिस्चार्ज, तिघांचा मृत्यू
अकोला,दि.27जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1499 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1288 अहवाल निगेटीव्ह तर 211 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 179 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर तीन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.26)
रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 69 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 15672(12906+2589+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व
जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 100964 नमुने तपासण्यात आले.
त्यात प्राथमिक तपासणीचे 98792 फेरतपासणीचे 373 तर वैद्यकीय
कर्मचाऱ्यांचे 1799 नमुने होते.
आजपर्यंत एकूण 100924 अहवाल प्राप्त झाले
आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 88018 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
211 पॉझिटिव्ह
आज सकाळी 154 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 60 महिला व
94 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील 26, मुर्तिजापूर येथील 15, पातूर येथील 13, मासा येथील नऊ, जठारपेठ येथील सात, आदर्श कॉलनी, खेतान नगर, न्यु खेतान नगर, सिंधी
कॅम्प, रामदासपेठ व नवेगाव ता.पातूर येथील प्रत्येकी चार,
उन्नती नगर, बसंत नगर, बार्शीटाकळी, जूने शहर, भागवतवाडी येथील प्रत्येकी तीन, बाळापूर, भंडारज बु, संतोष नगर,
कौलखेड, खडकी, श्रध्दा
नगर, विझोरा ता.बार्शिटाकळी व पिंझरा येथील प्रत्येकी दोन,
तर उर्वरित पळसो भदे, म्हैसांग, मलकापूर, केशव नगर, कृष्ण नगरी,
संत नगर, लहरिया नगर, महसूल
कॉलनी, बंजारा कॉलनी, गोरक्षण रोड,
लहान उमरी, गणेश कॉलनी, गवलीपुरा,
कारला ता.तेल्हारा, जवाहर नगर, बोरगाव मंजू, पिंपलखुटा, महागाव,
दानेद बु., डाबकी रोड, शास्त्री
नगर, हरीहरपेठ, कोठारी वाटीका, तापडीया नगर, जाजू नगर, रवी
नगर, राधा उद्योग, अन्वी व मळसूर
ता.पातूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी 57 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले. त्यात आठ महिला व 49 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील 14,
पारस येथील आठ, एमआयडीसी येथील सात, तिवसा ता.बार्शीटाकळी, जीएमसी व उमरा ता.अकोट येथील
प्रत्येकी तीन, बाळापूर व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी दोन
तर उर्वरित रतनलाल प्लॉट, रवी नगर, खडकी,
डाबकी रोड, दाबेकर नगर, बाशीटाकळी,
जुमन नगर, मलकापूर, दहिहांडा,
शिवणी, किर्ती नगर, सिंधी
कॅम्प, कासली बु., पोपटखेड ता.अकोट व
कुटासा ता.अकोट येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.
दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात 69 जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह
पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद
घ्यावी. दरम्यान आज दिवसभरात सकाळी आरटिपीसीआरच्या
चाचण्यात 154, सायंकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 57 तर रॅपिड चाचण्यात 69
असे एकूण 280 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
179 जणांना डिस्चार्ज
दरम्यान
आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ८२ जण, हॉटेल स्कायलार्क
येथून ११, हॉटेल रिजेंसी येथून दोन, सुर्यचंद्र
हॉस्पीटल येथून चार, तर होम आयसोलेशन येथून ८०, अशा एकूण १७९ जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे, अशी
माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
तिघांचा मृत्यू
दरम्यान आज तिघांचा मृत्यू झाला. त्यात खापरवाडी अकोट येथील
रहिवासी असलेल्या 60 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 21 रोजी दाखल करण्यात आले होते, तर सायंकाळी अकोट
येथील रहिवासी असलेल्या 66 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 15 रोजी
दाखल करण्यात आले होते, तर अन्य चर्तुभूज कॉलनी, अकोला येथील रहिवासी असलेल्या पुरुषाचा खाजगी हॉस्पीटल येथे मृत्यू झाला.
या रुग्णास दि. 16 रोजी दाखल करण्यात आले होते. अशी माहिती सकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून देण्यात आली.
3239 जणांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 15672(12906+2589+177) आहे. त्यातील 366 जण मयत आहेत.
डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 12067 आहे. तर
सद्यस्थितीत 3239 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा