हॉटेल तुषार येथे संस्थात्मक अलगीकरण केंद्र

 

अकोला,दि. २२(जिमाका)- कोविड रुग्णांना विलगीकरणात राहण्याकरीता शुल्क आकारणी करुन हॉटेल तुषार येथे संस्थात्मक अलगीकरण केंद्र चालविण्यास अटी, शर्तीसह जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेशाव्दारे परवानगी देण्यात आली आहे.  

अटी व शर्ती :

अलगीकरण केंद्रामध्‍ये त्‍यांनी आयसीएमआर(ICMR) यांनी दिलेल्‍या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील, तसेच महाराष्‍ट्र शासनाचे वेळोवेळी निर्गमित होणारे आदेश मार्गदर्शक सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अलगीकरण केंद्र हॉटेल तुषार येथे आवश्‍यक बेडची  व्‍यवस्‍था करावे, एकाच कुटुंबातील अधिक रुग्‍ण असल्‍यास क्षमता वाढविण्‍यात यावी, या सेंटरमध्‍ये रुग्णांचे उपचारार्थ लागणारा पुरेशा प्रमाणातील तज्ञ डॉक्‍टर व कर्मचारी, अधिकारी वर्ग २४ X ७ नियमीतपणे उपस्थित ठेवावा लागेल, तसेच N-९५ मास्‍क, डिजिटल थर्मामिटर, अत्‍यावश्‍यक सेवा ह्या २४ X ७ पुरविणे आवश्‍यक राहील, अलगीकरण केंद्रामध्‍ये दाखल केलेल्‍या रुग्‍णांना ते घेत असलेल्‍या सोई सुविधांकरीता नियमानुसार माफक शुल्‍क आकारण्‍यांत यावे, असे आदेशाव्दारे कळविण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले