आगर ता.अकोला; सर्तक क्षेत्र घोषित


अकोला,दि.10 (जिमाका)-  आगर ता. अकोला येथील महेन्द्र शिरसाट यांच्या परसातील दोन गावरान कोंबडया मृत आढळले असून त्या मृत पक्षांचे नमूने घेऊन ते रोग अन्वेषण विभाग पुणे मार्फत राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था, भोपाळ येथे पाठविण्यात आले आहेत. हा अहवाल येईपर्यंत बाधित क्षेत्रापासूनचा 10 कि.मी. परिसर सतर्क क्षेत्र घोषित करण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.

सतर्कतेचा आदेश निर्गमित -

मौजे आगर ता.अकोला येथील महेन्द्र शिरसाट यांच्या परसापासून त्रिज्येतील क्षेत्रापासून आजूबाजूचा 10 कि.मी. त्रिज्येतील क्षेत्र सतर्क क्षेत्र व सर्वेक्षण झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. प्रभावित क्षेत्राच्या ठिकाणी वाहनांच्या येण्याजाण्यास मनाई करण्यात येत आहे. प्रभावी क्षेत्रातील परिसरामध्ये दोन टक्के सोडियम हायड्रोक्साईड किवा पोटॅशियम परमॅगनेटने निर्जंतुकीकरण करावे, प्रभावित क्षेत्रातील पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या व्यक्तीनी चेहऱ्यावर मास्क लावणे तसेच हातामोजांचा वापर करणे अनिवार्य आहे. वापरण्यात आलेल्या मास्क तसेच हातमोजांची  योग्यप्रमाणे विल्हेवाट लावण्यात यावी.

            प्रभावित क्षेत्रातील पोल्ट्रीफार्म मध्ये इतर कुठलेही पशु-पक्षी येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, प्रभावित क्षेत्रातील पोल्ट्रीफार्म मधील पक्षांसंबंधीच्या आवश्यक त्या सर्व नोंदी अद्यावत व व्यवस्थीत ठेवण्यात याव्यात, तसेच परिसरामध्ये जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांनी खबरदारीचे उपाय व सर्वेक्षणाचे काम त्वरीत सुरु करुन आवश्यक त्या उपाययोजना  कराव्यातअसे आदेशात नमूद केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले