519 अहवाल प्राप्त, 175 पॉझिटिव्ह, 46 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू


अकोला,दि.22(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 519 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 344 अहवाल निगेटीव्ह तर 175  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 46  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला तर दोन  रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.21) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 31 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 14141(11598+2366+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 94043 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 91889 फेरतपासणीचे 371 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1783 नमुने होते. आजपर्यंत एकूण 93900 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 82302    आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

175 पॉझिटिव्ह

आज सकाळी 165 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 51 महिला व 114 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मुर्तिजापूर येथील 28, अकोट येथील 20, जीएमसी व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी आठ, कान्हेरी सरप व जठारपेठ येथील प्रत्येकी पाच, देवरावबाबा चाळ, कौलखेड, खडकी, मोठी उमरी, डाबकी रोड व उगवा येथील प्रत्येकी चार, आदर्श कॉलनी, रामदास पेठ, न्यु तापडीया नगर, सुधीर कॉलनी व गिता नगर येथील प्रत्येकी तीन, तापडीया नगर, मलकापूर, केशव नगर, सिंधी कॅम्प, अमृतवाडी,दगडी पूल, बलोदे लेआऊट, गजानन पेठ, मराठा नगर, बाजोरीया नगर व अकोट येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित उरळ, एपीएमसी मार्केट, गोकूल कॉलनी, रवी नगर, विद्या नगर, जूने शहर, निबंधे प्लॉट, गंगाधर प्लॉट, चांदुर, तोष्णीवाल लेआऊट, सातव चौक, शिवाजी नगर, गड्डम प्लॉट, व्दारका नगर, खोलेश्वर, गजानन नगर, अजिक्य नगर, अकोट फैल, खदान नाका, राऊतवाडी, लहरीया नगर, मलकापूर, गंगा नगर, रजपूतपुरा, निमवाडी, सिंधीखेड ता. बार्शीटाकळी, माना ता.मुर्तिजापूर, कृष्ण नगरी, पैलपाडा बोरगाव मंजू व माणिक टॉकीज येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी 10 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. मुर्तिजापूर येथील पाच, तर उर्वरित जांभा बु. ता.मुर्तिजापूर, तुकाराम चौक, गोरक्षण रोड, पातूर व न्यु तापडीया नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात 31 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

46 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 31, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, ओझोन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल स्कायलार्क येथून एक, बिहाडे हॉस्पीटल येथून चार, सूर्यचंद्र हॉस्पीटल येथून दोन, अवघाते हॉस्पीटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, असे एकूण 46 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती  जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

दोघांचा मृत्यू

दरम्यान आज दुपारनंतर दोघांचा मृत्यू झाला. त्यात तिवसा ता. बार्शीटाकळी  येथील रहिवासी असलेल्या २१  वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि.२१ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य पातूर येथील ५८ वर्षीय पुरुषांचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. १९  रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

2155 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 14141(11598+2366+177) आहे. त्यातील 355 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 11631 आहे. तर सद्यस्थितीत 2155 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ