रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 43 चाचण्यात आठ पॉझिटीव्ह
अकोला,दि. 6(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे.
यात आज दिवसभरात झालेल्या 43 चाचण्या झाल्या त्यात
आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय
खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात अकोट येथे 22 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला, बार्शीटाकळी येथे एक, तेल्हारा
येथे चार, अकोला आयएमए येथे पाच,
आरोग्य कर्मचाऱ्यांचे नऊ, हेगडेवार लॅब येथे दोन
चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला
नाही. अशा एकूण 43 चाचण्यांमधून
आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.
आतापर्यंत जिल्ह्यात 32 हजार 340 चाचण्या झाल्या पैकी
2124 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा