रुग्णवाहीकांचे भाडेदर निश्चित
अकोला,दि.25(जिमाका)- मा. उच्च
न्यायालयाने रुग्णवाहीकांचे भाडेदर ठरविण्याबाबतचे निर्देश दिले होते. त्यानुसार
अकोला जिल्ह्याकरीता सामान्य नागरिेकांच्या दृष्टीने तसेच रुग्णवाहिकांच्या मालकाच्या दृष्टीने सोईचे
व हिताचे होईल त्याअनुषंगाने प्रादेशिक
परिवहन प्राधिकरण, अकोला यांनी रुग्णवाहिकांच्या सुधारित भाडेदर दिले आहेत.
मारुती व्हॅनचे महानगरपालीका क्षेत्राचे
रुगणवाहिकांचे भाडेदर पाचशे रुपये प्रती एक फेरी(25कि.मी.पर्यंत),
महानगरपालिका क्षेत्र सोडून एक हजार रुपये
व जिल्हाबाहेर प्रती कि.मी. अकरा रुपये प्रमाणे. टाटा सुमो व मॅटडोरचे महानगरपालीका
क्षेत्राचे रुगणवाहिकांचे भाडेदर सहाशे रुपये प्रती एक फेरी(25कि.मी.पर्यंत),
महानगरपालिका क्षेत्र सोडून एक हजार चारशे
रुपये व जिल्हाबाहेर प्रती कि.मी. बारा
रुपये प्रमाणे. टाटा 407 व स्वराज मझदाचे महानगरपालीका क्षेत्राचे रुगणवाहिकांचे
भाडेदर सातशे रुपये प्रती एक फेरी(25कि.मी.पर्यंत), महानगरपालिका क्षेत्र सोडून रु. एक हजार तिनशे व जिल्हाबाहेर
प्रती कि.मी. चौदा रुपये प्रमाणे तर आय.सी.यु. अथवा वातानुकुलित वाहनात वातनुकूलीत
यंत्रणा वाहनात बसविली असल्यास नमुद दरात 15 टक्के वाढीव दराने राहील.
जिल्ह्यांतील नागरिकांनी भाडेदर
व्यतिरिक्त रुग्णवाहीका चालक व मालक यांनी अतिरिक्त भाडेदरची आकारणी केल्यास
त्याबाबतची तक्रार उपप्रादेशिक परिवहन
कार्यालय, अकोला येथे करण्यात यावी. जेणेकरुन संबंधीत रुग्णवाहीका चालक व मालकावर
नियमानुसार कारवाई करणे शक्य होईल, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद
जिचकार यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा