रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः८१ चाचण्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह

 अकोला,दि. १९ (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या ८१ चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात अकोट येथे सहा, बार्शीटाकळी  येथे दोन, बाळापूर येथे तीन, तेल्हारा येथे आठ,  मुर्तिजापूर येथे एक, अकोला आयएमए येथे सात, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या २८ तर डॉ. हेडगेवार लॅब येथे तीन  चाचण्या झाल्या. त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर जीएमसी येथे २३ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. अशा एकूण ८१ चाचण्यांमधून दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात ३१ हजार ५१ चाचण्या झाल्या पैकी २०५३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ