291 अहवाल प्राप्त, 30 पॉझिटीव्ह, 34 डिस्चार्ज

 

अकोला,दि.29 (जिमाका)-आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 291 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 261 अहवाल निगेटीव्ह तर 30 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. 34 जणांना  डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.29) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये तीन अहवाल पॉझिटीव्ह आले होते.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्हअहवालांची एकूण  संख्या 11566(9351+2038+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 84373 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 82604 फेरतपासणीचे 335  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1434 नमुने होते. आजपर्यंत एकूण 84168 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 74817 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

30 पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात 30 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 30 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 12 महिला व 18 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील राउतवाडी येथील चार, तोष्णीवाल लेआऊट, गोकुल कॉलनी व मूर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन, गोरक्षण रोड येथील दोन, तर उर्वरित जठारपेठ,भागवती नगर, आदर्श कॉलनी, बार्शीटाकली, केशव नगर, वानखडे नगर, सिंधी कॅम्प, आळशी प्लॉट, तुकाराम चौक, किर्ती नगर, खदान, शेलू वेताळ ता. मूर्तिजापूर, काला चबुतरा, मलकापूर व जुने शहर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.  तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. 

दरम्यान काल रात्री (दि. 29) रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात तीन  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

34 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून एक, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, स्कायलार्क हॉटेल येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून पाच, बिहाडे हॉस्पिटल येथून एक तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले 21 अशा एकूण 34 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

684 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 11566(9351+2038+177) आहे. त्यातील 335 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 10547 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 684 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ