रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः५५ चाचण्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह

 अकोला,दि. १८ (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या ५५ चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात अकोट येथे चार, बार्शीटाकळी  येथे दोन, तेल्हारा येथे सात, मुर्तिजापूर येथे नऊ तर २१ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चाचण्या झाल्या. त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर जीएमसी येथे आठ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आले. तर डॉ. हेडगेवार लॅब येथे चार जणांच्या चाचण्या झाल्या त्यात दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. अशा एकूण ५५ चाचण्यांमधून तिघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात ३० हजार ९६१ चाचण्या झाल्या पैकी २०४९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ