रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 126 चाचण्यांत पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह

 

अकोला,दि. 12(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 126 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात अकोट येथे 52 चाचण्या झाल्या त्यात तिघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, बाळापूर येथे तीन, बार्शीटाकळी येथे चार, तेल्हारा येथे तीन, आयएमए येथे नऊ, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 19 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 36 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. अशा एकूण 126 चाचण्यांमधून पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 30 हजार 548 चाचण्या झाल्या पैकी 2016 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना