ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कलम ३६ अन्वये पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान


        अकोला,दि. (जिमाका)- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या  दरम्यान जिल्ह्यात  शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी  जिल्हा पोलीस अधिक्षक अकोला यांना मुंबई पोलीस अधिनियमच्या कलम ३६ नुसार प्राप्त अधिकारान्वये अकोला जिल्ह्यातील सर्व पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरीष्ठ  अधिकाऱ्यांना दि.८ ते दि. २१ चे २४.०० वाजेपर्यंत खालील अधिकार प्रदान केले असल्याचे आदेश जारी केले आहेत.

         यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, ग्रामपंचायत निवडणूकी दरम्यान जिल्ह्यात  शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी  जिल्हा पोलीस अधिक्षक अकोला यांना मुंबई पोलीस अधिनियमच्या कलम ३६ नुसार प्राप्त अधिकारान्वये अकोला जिल्ह्यातील सर्व पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरीष्ठ  अधिकाऱ्यांना दि.८ ते दि. २१ चे २४.०० वाजेपर्यंत खालील अधिकार प्रदान केले असल्याचे आदेश जारी केले आहेत.

    प्रदान केलेल्या अधिकारात; रस्त्यावरुन जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांची  वर्तणूक कशी असावी ?  याविषयी निर्देश देणे, मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी उपासनेच्या सर्व जागेचे आसपास, उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याने किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याच्या जागी  गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होवू न देणे, अशा कोणत्याही मिरवणुका ज्या मार्गाने जाव्यात किंवा ज्या मार्गाने जावू नयेत ते ‍ विहीत करणे, सर्व रस्त्यावर व नदीच्या घाटावर आणि सार्वजनिक स्नानाचे, कपडे धुण्याचे, उतरण्याचे ठिकाणी जागेमध्ये देवालय किंवा इतर सार्वजनिक किंवा जागेत किंवा जागेजवळ वाद्य वाजविण्याचे किंवा गाण्याचे किंवा ढोल ताशे, शिट्टया व इतर कर्कश वाद्य वाजविणे वगैरे बाबत नियम तयार करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा सार्वजनिक उपहाराच्या (अतिथी गृहाच्या) जागेत, ध्वनीक्षेपकाचा (लाऊडस्पिकर) उपयोग करण्याचे नियम करणे व त्यावर नियंत्रण करणे, सक्षम अधिकाऱ्यांनी ह्या अधिनियमांचे कलम ३३, ३६, ३७ ते ४०, ४२, ४३ व ४५ अन्वये केलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे, या बाबींचा समावेश आहे, असे पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनी कळविले आहे.

जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवार दि. १५ रोजी मतदान घेण्यात येत असून सोमवार दि. १८ रोजी तालुकानिहाय तहसील कार्यालयच्या ठिकाणी मतमोजणी करण्यात येणार असून  निवडणूकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.या पार्श्वभुमिवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी  स्थानिक पातळीवर निर्णय घेता यावे यासाठी हे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना