387 अहवाल प्राप्त, 42 पॉझिटीव्ह, 32 डिस्चार्ज

 


अकोला,दि.28 (जिमाका)-आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 387 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 345 अहवाल निगेटीव्ह तर 42 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. 32 जणांना  डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.27) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये नऊ अहवाल पॉझिटीव्ह आले होते.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्हअहवालांची एकूण  संख्या 11495(9087+2031+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 83677 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 81913 फेरतपासणीचे 332  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1432 नमुने होते. आजपर्यंत एकूण 83602 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 74515 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

42 पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात 42 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 18 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच महिला व 13 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील गोरक्षण रोड येथील दोन, तर उर्वरित मुर्तीजापूर, कापसी रोड ता.पातूर, खेडकर नगर, अकोट फैल, राजपूतपुरा, जीएमसी, राऊतवाडी, रामदासपेठ, शिवाजी नगर, जठारपेठ, शिवार, राजखेड, संतोष नगर, अन्वी ता. मुर्तिजापूर, जूने शहर व पारस येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी  24 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व 17 पुरुषांचा समावेश आहे. त्यात अकोट व न्यु तापडीया नगर येथील प्रत्येकी तीन, हिवरखेड, गोकुल कॉलनी व सरस्वती इंजी. स्कूल केशव नगर येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित गोरक्षण रोड, शास्त्री नगर, दहिगाव गांवडे ता.अकोट, केशव नगर, कौलखेड, जूने शहर, राजपूतपुरा, बंजारा कॉलनी, रणपिसे नगर, टेलीफोन कॉलनी, सहकार नगर व बलवंत कॉलनी येथील एक याप्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान काल रात्री (दि. 27) रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

32 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आठ, आयकॉन हॉस्पीटल येथून पाच, हॉटेल स्कायलार्क येथून सात, बिहाडे हॉस्पीटल येथून दोन, तसेच होम आयसोलेशन येथून 10, अशा एकूण 32 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

650 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 11495(9087+2031+177) आहे. त्यातील 335 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 10510 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 650 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ