32 वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह विविध कार्यक्रमाद्वारे साजरा करणार -उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार

 



        अकोला,दि.15(जिमाका) -  32 वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन सोमवार  (दि.18)   पासुन सुरूवात होत असुन हा सप्ताह विविध कार्यक्रमाद्वारे  साजरा करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन  अधिकारी विनोद जिचकार यांनी दिली.

            यामध्ये रस्ता सुरक्षा विषयक बॅनर्स प्रदशित करणे, पत्रके  वाटणे, शिबीर  कार्यालयात चालकांना रस्ता सुरक्षा  विषयी मार्गदर्शन करणे,  दुचाकी हेल्मेटची तपासणी,  चालकांना रस्ता सुरक्षा विषयक प्रशिक्षण , ओव्हरलोड, वाहनाची तपासणी करणे,  ट्रॅक्टर व  ट्रेलर्सवर परावर्तीला लावणे, विमा प्रमाणपत्र नसणा-या वाहनांची  तपाणी करणे, रिक्षा चालकांना रस्ता सुरक्षा  विषयक मार्गदर्शन करणे , सिटबेल्ट तपासणी करणे, चालकांची डोळे तपासणी शिबीराचे आयोजन, ऑटोरिक्षा मधुन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतुक तपासणी करणे , रस्ता सुरक्षा  विषयक प्रश्न मंजुषाचे आयोजन, बैल गाड्यांना  रिफ्लेक्टर लावणे,  दुचाकी वाहनांची हेल्मेट,  विमा व ------  तपासणी करणे,  रात्र तपासणी मोहिमेतंर्गत हेडलाईट, अप्पर/डिप्पर तपासणी कामे, आकाशवाणी/ दुरदर्शन  वरून रस्ता सुरक्षा विषयक कार्यक्रम प्रस्तावित करणे, शहरातुन रस्ता सुरक्षतेसाठी हेल्मेट रॅलीचे आयोजन करणे,  निबंध स्पर्धेचे आयोजन,  अपघाताचे वेळी  केले जाणारे प्रथमोपचार व प्रवाशांची सुरक्षितता या विषयाविषयी  मार्गदर्शन, मोटार ड्रायव्हिंग स्कुल चालक व मालक यांच्यासाठी प्रशिक्षण  आणि विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. सदर रस्ता सुरक्षा सप्ताह 18 जानेवारी ते 17 फेब्रूवारी  या कालावधीत राबविण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ