रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 112 चाचण्यांत नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह

 


अकोला,दि. 14(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 112 चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात बार्शीटाकळी येथे दोन, मुर्तिजापूर येथे पाच, अकोला आयएमए येथे पाच, आरोग्य कर्मचारी येथे 13 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर अकोट येथे 28 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 48 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, हेगडेवार लॅब येथे 11 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले,  अशा एकूण 112 चाचण्यांमधून नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 30 हजार 722 चाचण्या झाल्या पैकी 2033 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ