बर्ड फ्ल्यूः नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय ‘वॉर रुम’

 अकोला,दि.२१ (जिमाका)- बर्ड फ्ल्यूच्या संसर्गाच्या स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय वॉररुम तयार करण्यात आली आहे,असे  जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. तुषार बावने व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गजानन दळवी यांनी कळविले आहे. या वॉररुममध्ये दररोज  पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक,  लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेटर इ. ची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील बर्ड फ्लू व तत्संबंधित घटनांवर येथून नियंत्रण ठेवणे, तात्काळ क्षेत्रीय उपाययोजना करणे,  पुणे येथील पशुसंवर्धनआयुक्त कार्यालयाशी  संपर्कात राहणे आदी कामे या वॉररुम मधून करण्यात येतील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ