79 अहवाल प्राप्त, 12 पॉझिटीव्ह, 28 डिस्चार्ज, दोन मयत


अकोला,दि.25 (जिमाका)-आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्गत तपासणीचे 79 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 67 अहवाल निगेटीव्ह तर 12  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. 28 जणांना  डिस्चार्ज देण्यात आला, तर दोन रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.24) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्हअहवालांची एकूण  संख्या 11409(9012+2020+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 82628 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 80879 फेरतपासणीचे 324  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1425 नमुने होते. आजपर्यंत एकूण 82512 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 73500 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

12 पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात 12 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 12 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एक महिला व 11 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील  मलकापूर व  पिकेव्ही येथील दोन, तर उर्वरित सिंधी कॅम्प, भगतसिंग चौक, रणपिसे नगर, वाकोडी ता. तेल्हारा, गोरेगाव, गोरक्षण रोड, द्वारका नगरी व माधव नगर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.  तर आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.  

दरम्यान काल रात्री (दि. 24) रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

दोघांचे मृत्यू

दरम्यान आज दोघांचे मृत्यू झाले. त्यात तापडीया नगर येथील 65 वर्षीय पुरुषाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला त्यांना 12 जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते तर मोठी उमरी येथील 71 वर्षीय पुरुषाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला त्यांना 13 जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

28 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून आठ, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, स्कायलार्क हॉटेल येथून दोन, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले 16 अशा एकूण 28 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

645 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 11409(9012+2020+177) आहे. त्यातील 334 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 10430 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 645 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ