नकाशी येथे मृत पक्षी आढळले; सतर्क क्षेत्र घोषित

 अकोला,दि.२१ (जिमाका)- नकाशी ता. बाळापूर येथे  तलावात ४१ मृत पक्षी आढळले आहेत. या पक्षांचे  नमुने घेऊन ते  रोग अन्वेषण विभाग पुणे मार्फत  राष्ट्रीय  उच्च सुरक्षा पशुरोग संस्था, भोपाळ  येथे पाठविण्यात आले आहेत. हा अहवाल येईपर्यंत नकाशी येथील तलावाच्या १० किमी त्रिज्या परिसर सतर्क क्षेत्र घोषित करण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत. या आदेशात म्हटल्याप्रमाणे-

 या ठिकाणांपासून  १० कि.मी. त्रिज्‍येतील क्षेत्र सतर्क क्षेत्र ( Alert Zone)   म्‍हणून जाहीर करण्‍यात आले आहे.  या प्रभावित क्षेत्रातील परिसरामध्‍ये  २ टक्‍के सोडियम हायड्रोक्‍साईड किंवा पोटॅशियम परमॅगनेटने  निर्जंतुकीकरण करावे.  तसेच प्रभावित क्षेत्रातील पोल्‍ट्री फार्ममध्‍ये  काम करणाऱ्या  व्‍यक्‍तींनी  चेहऱ्यावर मास्‍क लावणे तसेच हातामोजांचा वापर करणे अनिवार्य आहे.  वापरण्‍यात आलेल्‍या मास्‍क तसेच  हातमोजांची योग्‍यप्रमाणे  विल्‍हेवाट लावण्‍यात यावी. प्रभावित क्षेत्रातील पोल्‍ट्रीफार्म मध्‍ये इतर कुठलेही पशु-पक्षी येणार नाही याची दक्षता घेण्‍यात यावी. प्रभावित क्षेत्रातील  पोल्‍ट्रीफार्म मधील पक्षांसंबंधीच्‍या आवश्‍यक त्‍या सर्व नेांदी अद्ययावत व व्‍यवस्थित ठेवण्‍यात याव्‍यात,असे आदेशात नमूद केले आहे. या आदेशाचा  भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता- १८६० च्या कलम  १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल व संबंधितावर कारवाई करण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था , संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्या  याद्वारे  प्राधिकृत करण्यात आले आहे, असेही जिल्हाधिकारी  तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेशात म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा