244 अहवाल प्राप्त, 49 पॉझिटीव्ह, 17 डिस्चार्ज, एक मयत

 

अकोला,दि.31 (जिमाका)-आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 244 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 195 अहवाल निगेटीव्ह तर 49 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. 17 जणांना  डिस्चार्ज देण्यात आला, तर एका व्यक्तीचा मृत्यू झाले असल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.30) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये तीन अहवाल पॉझिटीव्ह आले होते.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्हअहवालांची एकूण  संख्या 11618(9400+2041+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 84492 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 82719 फेरतपासणीचे 339  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1434 नमुने होते. आजपर्यंत एकूण 84412 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 75012 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

49 पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात 49 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 49 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 15 महिला व 34 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट व जठारपेठ येथील प्रत्येकी पाच,  गोरक्षण रोड येथील तीन, डाबकी रोड, मोठी उमरी, कौलखेड, मिट क्लासेस व पैलपाडा येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित लहान उमरी, बाळापूर, बोरगाव मंजू, पिंपले नगर, शेलू बोण्डे मूर्तिजापूर, न्यू तापडीया नगर, राम नगर, गायगाव बाळापूर, कौलखेड जहांगीर, आंबेडकर नगर, पातूर, कपिलवास्तू नगर, गजानन पेठ, एमजी रोड, भंडारज बु., रणपिसे नगर, शास्त्री नगर, वैकेटेश नगर, ज्योती नगर, सिंधी कॅम्प, कोठारी वाटिका, विवरा कॉलनी, तापडीया नगर, म्हैसपूर, छावा व राम मंदिर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.   तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. 

दरम्यान काल रात्री (दि. 30) रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात तीन  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

17 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून चार, आयकॉन हॉस्पिटल येथून चार, स्कायलार्क हॉटेल येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, अवघते हॉस्पिटल येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल येथून चार, अशा एकूण 17 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

एकाचा मृत्यू

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण शिवणीवारपूर, अकोट येथील 75 वर्षीय पुरुषाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला त्यांना 30 जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.

 

718 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 11618(9400+2041+177) आहे. त्यातील 336 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 10564 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 718 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ