275 अहवाल प्राप्त, 34 पॉझिटीव्ह, तीन डिस्चार्ज

 


अकोला,दि.29 (जिमाका)-आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 275 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 241 अहवाल निगेटीव्ह तर 34 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. तीन जणांना  डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.28) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये चार अहवाल पॉझिटीव्ह आले होते.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्हअहवालांची एकूण  संख्या 11533(9321+2035+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 84011 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 82244 फेरतपासणीचे 334  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1433 नमुने होते. आजपर्यंत एकूण 83877 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 74556  आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

34 पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात 34 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 25 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 10 महिला व 15 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मुर्तिजापूर येथील चार, केडीया प्लॉट व बाजोरीया नगरी हिगणा रोड येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित जठारपेठ, राऊतवाडी, कौलखेड, फिरडोस कॉलनी, अटकळी ता.तेल्हारा, देवलगाव ता.पातूर, अकोला बु., गोरक्षण रोड, अधिकारी निवास, बार्शिटाकळी, तापडीया नगर, केशवनगर, बालाजी नगर, सिंधी कॅम्प, राजनखेड, रणपिसे नगर व जूने शहर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. आज सायंकाळी  नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे. त्यात पीडीकेव्ही येथील दोन, तर उर्वरित अकोट, लहान उमरी, जून आरटीओ रोड, जठारपेठ, खडकी, देवगाव व गोयंका लेआऊट येथील एक याप्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान काल रात्री (दि. 28) रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

तीन जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

685 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 11533(9321+2035+177)आहे. त्यातील 335 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 10513 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 685 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ