509 अहवाल प्राप्त, 32 पॉझिटीव्ह, 30 डिस्चार्ज
अकोला,दि.12 (जिमाका)-आज
दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत)
कोरोना संसर्गत तपासणीचे 509 अहवाल
प्राप्त झाले. त्यातील 477 अहवाल निगेटीव्ह तर 32 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर 30 जणांना डिस्चार्ज देण्यात आले असल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्याल याने कळविले आहे.
त्याच
प्रमाणे काल (दि.11) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते.
त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 10971(8833+1961+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 75221
जणांचे अहवाल आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 73532 फेरतपासणीचे 300 तर वैद्यकीय
कर्मचाऱ्यांचे 1389 नमुने होते. आजपर्यंत
एकूण 75154 अहवाल प्राप्त झाले
आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 66321
तर पॉझिटीव्ह अहवाल 10971(8833+1961+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली
आहे.
आज 32 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 32 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
आले. आज सकाळी 29 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 12 महिला व 17 पुरुषांचा
समावेश आहे. त्यातील कौलखेड, गोरक्षण रोड, भाटोरी ता. मूर्तिजापूर, मूर्तिजापूर,खडकी, मोठी उमरी व जुना हिंगणा येथील प्रत्येकी दोन,
तर उर्वरित अकोट, रतनलाल प्लॉट, डाबकी रोड, संताजी नगर, कीर्ती
नगर, रामदास पेठ, तापडीया नगर, आदर्श कॉलनी, शिवचैतन्य हॉस्पिटल हिवरखेड रोड, अशोक नगर, जीएमसी बॉय हॉस्टेल, बिसेन लेआऊट, व्हीबीएच कॉलनी, बाभूळगाव ता. पातूर व मित्रा नगर
येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला व दोन
पुरुषांचा समावेश असून ते अंदुरा येथील दोन तर अकोट येथील एक याप्रमाणे रहिवासी
आहे.
दरम्यान
काल रात्री (दि.11) रॅपिड
ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात चार जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह
पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
30
जणांना डिस्चार्ज
दरम्यान
आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून पाच, आयकॉन हॉस्पीटल येथून तीन,
हॉटेल स्कायलार्क येथून दोन, सूर्यचंद्रा
हॉस्पीटल येथून तीन, ओझोन हॉस्पीटल येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, अकोला अक्सीडेंट येथून
दोन, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले 11 अशा एकूण
३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे
599 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 10971(8833+1961+177) आहे. त्यातील 325 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 10047 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 599 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या
सूत्रांनी दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा