पिक संरक्षणासाठी घंटा यंत्र वाटप; अर्ज मागविले

 अकोला,दि.२० (जिमाका)- जंगली जनावरांपासून शेतातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत वाटप करण्यात येणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांकडून शुक्रवार दि.२२ ते दि.३१ या दरम्यान अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित पंचायत समितीमध्ये विहित नमुन्यात अर्ज करावा. अर्जासोबत स्वतःच्या नावाचा २०२०-२१ चा मुळ सातबारा उतारा, आधारकार्ड, ओळखपत्र जोडावे. निवड झाल्यास लाभार्थ्याला १०० रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर  यंत्राचा दुरुपयोग न करण्याबाबत बंधपत्र लिहून ते ही जोडावे लागेल. या योजनेच्या लाभार्थ्यांची निवड  ही अर्जांची छाननी करुन लॉटरी पद्धतीने दि. ४ व दि.५ फेब्रुवारी रोजी पंचायत समितीस्तरावर होईल. तरी शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावे. त्यासाठी त्यांनी पंचायत समितीचे कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विकास अधिकारी, कृषी विभाग, जिल्हा परिषद, अकोला यांच्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ