कोरोनाची लस अकोल्यात दाखल

         अकोला,दि.14 (जिमाका) -  कोरोनाची लस अकोल्यात दाखल झाली. असुन अकोल्यासाठी 9 हजार लसचे नियोजन करण्यात आले आहे.

            आरोग्य उपसंचालक  कार्यालयाच्या  जिल्हा ग्रामीण विकास  यंत्रणा येथे जिल्हा औषधी व लस  भांडारात जमा करण्यात आले  आहे. सदर व्हक्सीन 2 ते 8 डिग्री  तापमानात ठेवण्यात आले आहे. लस  सुरक्षतेत इतरत्र  जिल्ह्यात पाठविण्यात येणार आहे.

            16 जानेवारी  रोजी देण्यात येणा-या कोरोना लसीकरणाची  तयारी करण्यात आली असुन ही लस आरोग्य कर्मचा-यांना प्रथम देण्यात येणार आहे.  जिल्ह्यात 16 तारखेला  जिल्हा  स्त्री रूग्णालय,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय  आर्बिट हॉस्पीटल  येथे आरोग्य  विभागातील कर्मचा-यांना   लसीकरण करण्यात येणार आहे. एका सेंटर वर 100  जणांना लसीकरण करण्यात येणार असुन एका दिवसात  300 लोकांना लसीकरण करण्यात येणार आहे. त्यापुढील  नियोजन वेळोवेळी येणा-या  सुचनेप्रमाणे करण्यात येणार असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी दिली.  यासाठी  आरोग्य विभागाचे उपसंचालक





  डॉ. राजकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा  आरोग्य विभागाचे  अतिरीक्त जिल्हा आरोग्य  अधिकारी डॉ. विजय जाधव, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मनिष  शर्मा,  उपसंचालक  विभागाचे  मुख्य औषधी निर्माण अधिकारी प्रदिप  पहाडे,  राजेंद्र इंगळे, औषधी निर्माण अधिकारी  रामेश्वर मुंडे, सतिष रिठे, जयंत मालोकार व जिल्हा माध्यम अधिकारी  प्रकाश गवळी हे विशेष परिश्रम घेत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ