429 अहवाल प्राप्त; 48 पॉझिटीव्ह, 23 डिस्चार्ज
अकोला,दि.8 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून
(सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्गत तपासणीचे 429 अहवाल प्राप्त झाले.
त्यातील 381 अहवाल निगेटीव्ह तर 48 जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले. तर 23 जणांना डिस्चार्ज देण्यात आले
असल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्याल याने कळविले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.7) रॅपिड ॲटीजेन टेस्ट
मध्ये आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले
होते. त्यामुळे आता अकोला
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 10822(8707+1938+177) झाली आहे,
अशी माहिती शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी
दिली आहे.
शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत
एकूण 73662 जणांचे
अहवाल आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 71979 फेरतपासणीचे
296 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1387 नमुने
होते. आजपर्यंत एकूण 73508 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह
अहवालांची संख्या 64801 तर पॉझिटीव्ह अहवाल 10822(8707+1938+177)आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली
आहे.
आज 48 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 48 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 44 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 21 महिला व 23 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील सिंधी कॅम्प व डाबकी रोड येथील प्रत्येकी
चार,गोरक्षण रोड व जिल्हा परिषद कॉलनी येथील प्रत्येकी तीन,
न्यु खेतान नगर, गीता नगर, लहरीया नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित अकोट,
कौलखेड, उमरा ता. अकोट, देऊळगाव
ता. पातूर, पीडीकेव्ही हॉस्टेल, बाजोरीया
लेआऊट, राधाकिसन प्लॉट, कॉग्रेस नगर,
शांती नगर, मुंगशी, न्यु
राधाकिसन प्लॉट, खेतान नगर, लक्ष्मी
नगर, कच्ची खोली, न्यु हिंगणा वाशिम
रोड, न्यु तापडीया नगर, गांधी चौक,
व्हीएचबी कॉलनी, श्रद्धा नगर, कपीलवास्तु नगर, गणेश नगर, रामदास
पेठ, तारफैल व हिंगणा रोड येथील प्रत्येकी एक याप्रमाणे
रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन
महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. त्यात अकोट येथील तीन, तर
गोरक्षण रोड येथील एक याप्रमाणे रहिवासी आहे.
काल
(दि. 7) रात्री रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात आठ
जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्याचाही
समावेश आजच्या पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत व
ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे. याची कृपया नोंद घ्यावी.
23 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज
दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून नऊ जणांना,उपजिल्हा
रुग्णालय मुर्तिजापूर येथून एक, आयकॉन हॉस्पीटन येथून दोन,
ओझोन हॉस्पिटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क
येथून पाच, तसेच होम आयसोलेशन येथून पाच, अशा एकूण 23 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
582 रुग्णांवर उपचार सुरु
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा