२२०८ अहवाल प्राप्त, ४४ पॉझिटीव्ह, ३६ डिस्चार्ज

 अकोला,दि.२३ (जिमाका)-आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्गत तपासणीचे २२०८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २१६४ अहवाल निगेटीव्ह तर ४४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. ३६ जणांना  डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.२२) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नव्हता.

 त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्हअहवालांची एकूण  संख्या ११३३८(९१५०+२०११+१७७) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ८१२४७ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ९५० फेरतपासणीचे ३२०  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १४२३ नमुने होते. आजपर्यंत एकूण ८१२०३ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या  ७२०५३  तर पॉझिटीव्ह अहवाल आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

४४ पॉझिटीव्ह

आज सकाळी ३२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १४ महिला व १८ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील , वानखडे नगर, मुंडगाव ता. अकोट व दिपक चौक येथील प्रत्येकी दोन उर्वरित श्री समर्थ प्रा. स्कूल, रेणुका नगर,जि.प. तांडली, जि.प. नागोली,  जि.प. माना, जि.प. वाईमाना, जि.प. अकोली जहागीर, कांजरा ता. मूर्तिजापूर, सिरसो  ता. मूर्तिजापूर, कोळंबी  ता. मूर्तिजापूर, तारफाईल, गोरेगाव, डाळंबी, संगळुद, रमापूर ता. अकोट, पार्वती नगर, कौलखेड, सुधीर कॉलनी, सिंधी कॅम्प, द्वारका नगरी, राम नगर व तुकाराम चौक येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. आज सायंकाळी १२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील तीन तर जि.प. शाळा सातारगाव, सावरा, राधाबाई बकल विद्यालय लोहारा, उरळ बु., यशवंत लेआऊट, आदर्श कॉलनी, अंबोदा ता. अकोट, केशवराज वेताल ता.अकोट व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. 

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. कृपया नोंद घ्यावी.

३६ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १२, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, बिहाडे हॉस्पीटल येथून एक, स्कायलार्क हॉटेल येथून दोन, तर ओझोन हॉस्पिटल येथून एक,  तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले १८ अशा एकूण ३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

६२३ जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या ११३३८(९१५०+२०११+१७७) आहे. त्यातील ३३ जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची १०३८४ संख्या  आहे. तर सद्यस्थितीत ६२३ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ