रस्ता सुरक्षा अभियान; निबंधस्पर्धेचे आयोजन

 


अकोला,दि.27 (जिमाका)- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडुन 32 वे रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे. त्या अनुषंगाने रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती करिता शालेय विद्यार्थ्यांकरिता रस्त्यावरील अपघात-समस्या व उपाययोजना या विषयावर निबंधस्पर्धा आयोजन केलेले आहे. या विषयावरील निबंध स्पर्धेमध्ये वय वर्ष 12 ते 16 चे शालेय विद्यार्थी सहभाग घेवु शकतात. स्पर्धकांनी विषयांकित विषयावर निबंध लिहुन तो 5 फेब्रुवारी पर्यंत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालय, रिजनल वर्कशॉप मंगरुळपीर रोड, खडकी येथे जमा करावा. या स्पर्धेत प्रथम क्रमांकास एक हजार रुपये, व्दितीय क्रमांकास  सातशे रुपये तर तृतीय क्रमांकास पाचशे रुपयाचे प्रोत्साहनपर बक्षिस दिले जाणार आहे. स्पर्धकांनी आपले संपुर्ण नाव, शाळेचे नाव व वय इत्यादीची नोंद निबंधावर करावी. निबंधस्पर्धेत मोठया प्रमाणात सहभागी घेण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ