निराधारांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न- पालकमंत्री ना. कडू




   अकोला,दि.२७(जिमाका)-  बेघर निवाऱ्यात रहात असलेल्या निराधारांच्या हाताला काम, रोजगार देऊन त्यांचे सुयोग्य पुनर्वसन करुन त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करु,  अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी  येथील महापालिकेच्या बेघर निवारा येथील आश्रीतांना दिली.

पालकमंत्री ना. कडू यांनी येथील बेघर निवारा येथे  मंगळवारी (दि.२६) रोजी भेट दिली. यावेळी त्यांनी त्यांच्यावतीने येथील रहिवाशांना कपडे वाटप केले तसेच त्यांना जेवणही दिले. शिवाय संस्थेसाठी पाण्याचे फिल्टर यंत्रही बसवून दिले. यावेळी अकोल्याचे  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, तहसिलदार विजय लोखंडे, उपायुक्त पुनम कडंबे, आशाकिरण महिला विकास संस्थेच्या दुर्गा भड, व्यवस्थापक उषा राऊत आदी उपस्थ्इत होते. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते निराधारांना वैद्यकीय तपासणीनंतर प्राप्त चष्मेही वाटप करण्यात आले. गत वेळी पालकमंत्र्यांनी भेट दिल्यानंतर या  निवारा केंद्राचे  शौचालय, स्वच्छतागृहांची दुरुस्ती, रंगरंगोटी, दोन कक्षांचे नुतनीकरण इ. पुर्ण करण्यात आले. या कामाचीही त्यांनी पाहणी केली. येथील रहिवाशांना संजय गांधी निराधार योजना,  श्रावण बाळ योजना आदी योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला. त्याचे प्रमाणपत्र वाटपही यावेळी करण्यात आले.

आता या केंद्राला बेघर निवारा केंद्र न म्हणता ‘संत गाडगेबाबा घर’ असे म्हणावे असे ना. कडू यांनी सांगितले. येथील रहिवाशांनी आता भिक न मागता स्वतःकाम्काज करावे. त्यांना त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार  अगरबत्ती बनवणे, महिलांना कापसाच्या फुलवाती तयार करणे असे व्यवसाय देऊन त्यातून त्यांना  अर्थार्जन होईल. त्यातून त्यांच्या सक्षमीकरणासाठी  प्रयत्न करु, असे आश्वासन ना. कडू यांनी यावेळी दिले. आशा किरण महिला विकास संस्था अकोला अध्यक्ष दुर्गा भड,व्यवस्थापक उषा राऊत, प्रकल्प अधिकारी शंतनु भड, शितल उमाळे, वैभव बोळे,अक्षय बुंदेले, शुभम ठाकुर, संतोष ठाकुर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ