७४४ अहवाल प्राप्त, १३ पॉझिटीव्ह, १२ डिस्चार्ज; एक मयत

 अकोला,दि.२ (जिमाका)-आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्गत तपासणीचे ७४४  अहवाल प्राप्त झाले. त्यातील ७३१ अहवाल निगेटीव्ह तर १३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. १२ जणांना  डिस्चार्ज देण्यात आला, तर एका पुरुष  रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. 

त्याच प्रमाणे काल (दि.२) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या ११२९४(९१०६+२०११+१७७) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ७९०२९ जणांचे  अहवाल आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ७७२९४ फेरतपासणीचे ३१  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १४१ नमुने होते. आजपर्यंत एकूण ७८९९५ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या  ६९८८९  तर पॉझिटीव्ह अहवाल  ११२९४(९१०६+२०११+१७७) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

१३ पॉझिटीव्ह

आज सकाळी १३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील रणपिसे नगर व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी दोन उर्वरित पिंपळे नगर, समता कॉलनी, तापडीया नगर, दुर्गा चौक, चांदुर, मारोती नगर, देशमुख फैल, संत तुकाराम चौक व गोरक्षण रोड  येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. 

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

१२ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

काचा मृत्यू

दरम्यान दरम्यान आज एका ५८ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण कृषि नगर, अकोला येथील रहिवासी आहे. त्यांना बुधवार दि.२० रोजी दाखल करण्यात आले होते. आज उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

६१ जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या ११२९४(९१०६+२०११+१७७) आहे. त्यातील ३३ जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची १०३४८ संख्या  आहे. तर सद्यस्थितीत ६१पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ