जागतिक सुर्यनमस्कार दिन;ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन
अकोला,दि. ८(जिमाका)- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,
शिक्षणाधिकारी कार्यालय, क्रीडा
भारती, पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान संघ,
अजिंक्य फिटनेस क्लब, अकोला जिल्हा योगासन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सुर्य
नमस्कार दिना निमित्त ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१२ ते ३० जानेवारी या कालावधीत जिल्ह्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून उत्कृष्ट सुर्य नमस्कार करणारे तीन मुले व तीन मुली यांचा दोन मिनीटांचा सुर्यनमस्कार प्रात्यक्षिक व्हिडीओ अपलोड करावा. प्रात्यक्षिक व्हिडीओ मध्ये विद्यार्थी हे शालेय गणवेश किवा विशिष्ट व्यायाम पोषाख परिधान केलेले असावेत. दोन मिनीटापेक्षा जास्त कालावधी असलेला व्हिडीओ स्विकारला जाणार नाही. ही स्पर्धा ऑनलाईन असल्यामुळे व्हिडीओ हा शालेय परिसर किंवा घरातील ठिकाणावरुन तयार करावा. व्हिडीओचे मुल्यांकन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला मार्फत नियुक्त केलेल्या तज्ज्ञ परिक्षक समितीकडून करण्यात येईल. तरी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी सारिका तिवारी (७७६९०७६१६९), रश्मी जोशी (९९२२५१९०७४), धनंजय भगत(९७६४७८७२६७) व प्रशांत पाटील(९८८१००८५४४) या मोबाईल क्रमांकावर अपलोड करावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा