अकोला,दि. 6
(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट
राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 75 चाचण्या
झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
बाळापूर येथे एक, बार्शिटाकळी येथे चार, तेल्हारा
येथे चार, हेगडेवार लॅब येथे एक, आरोग्य कर्मचारी येथे सात जणांचे चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, मुर्तिजापूर येथे 11
चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला, अकोला आयएमए येथे 10 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला,
तर शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयात 37 चाचण्या झाल्या त्यात चार
जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत
जिल्ह्यात 29 हजार 971 रॅपिड ॲन्टीजेन चाचण्या झाल्या त्यापैकी 1980 पॉझिटीव्ह आले आहेत,
असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा