‘शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री’ केंद्राचे सचिव एकनाथ डवले यांच्या हस्ते उद्घाटन

 


अकोला,दि.२ (जिमाका)- जागतिकीकरणाच्या या पर्वामध्ये सर्व जग एक खेडे आहे. त्यात शेतकरी उत्पादन करत असलेला शेतमाल विक्री करण्याकरिता स्थानिक बाजारपेठ शोधण्याबरोबरच ज्याला  बाजारपेठेत मागणी आहे व ज्यापासून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळू शकेल अशा विकेल ते पिकेलया धोरणाचा अंगिकार करून पीक  पद्धती व शेतीची  जोपासना करण्यासाठी शेतकरी गटानी पुढाकार घ्यावा, असे राज्याचे कृषी सचिव एकनाथराव डवले  आज येथे सांगीतले.

मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेनुसार अंतर्गत सावता माळी रयत बाजार अभियाना अंतर्गत ' विकेल ते पिकेल ' या कार्यक्रमा अंतर्गत अकोला शहरात आज गोरक्षण रोडवर कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) मार्फंत शेतकरी गटामार्फत थेट शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री’ केंद्राचे उद्घाटन डवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेतकरी गटाला भाजीपाला विक्री करीता छत्री व कापडी पिशवी ही देण्यात आली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उदयकुमार नलावडे , प्रकल्प संचालक (आत्मा) डॉ.के .बी.खोत, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ.मुरली इंगले, अजय पराते, विजय शिराल, दीपक तायडे, ‘आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विजय शेगोकार, सहा तंत्र व्यवस्थापक सचिन गायगोल,जितेश नालट,जय बंजरंग शेतकरी गट,महात्मा फुले सेंद्रीय शेतकरी उत्पादक गटाचे अध्यक्ष सुरेश म्हैसने,संजय भवाने,योगेश बोले, प्रफुल्ल फाले, कृषी विभागाचे रविंद्र माली,अशोक करवते,नितेश घाटोल, सी.पी.नावकार, नागेश खराटे, धमेंद्र राठोड,शेतकरी गटामधील सदस्य उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम