रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 65 चाचण्यात तीन पॉझिटीव्ह
अकोला,दि.
29(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे.
यात आज दिवसभरात झालेल्या 65 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,अशी माहिती निवासी
उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात अकोट येथे 18, तेल्हारा
येथे तीन, अकोला आयएमए येथे पाच, आरोग्य कर्मचाऱ्यांचे नऊ, हेगडेवार लॅब येथे दोन
चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 28
जणांच्या चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आला. अशा
एकूण 65 चाचण्यांमधून तीन जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 31 हजार 704 चाचण्या झाल्या पैकी 2090 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा