448 अहवाल प्राप्त, 26 पॉझिटीव्ह, 36 डिस्चार्ज

 

अकोला,दि.14 (जिमाका)-आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्गत तपासणीचे 448 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 422 अहवाल निगेटीव्ह तर 26 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. तर 36 जणांना  डिस्चार्ज देण्यात आले असल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्याल  याने कळविले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.13) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 11040(8889+1974+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 75965  जणांचे  अहवाल आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 74271 फेरतपासणीचे 301 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1393 नमुने होते. आजपर्यंत एकूण 75899 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या  67010 तर पॉझिटीव्ह अहवाल  11040(8889+1974+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

 आज 26 पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात   26 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 26 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 11 महिला व 15 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील डाबकी रोड येथील चार, सहकार नगर, चिंतामणी नगर व जुने शहर येथील प्रत्येकी तीन, मलकापूर येथील दोन, तर उर्वरित कौलखेड, अकोट, शिवार, सराफा बाजार, जुने खेतान नगर, तोष्णीवाल लेआऊट, दुर्गा चौक, सिंधी कॅम्प, मोठी उमरी, जठारपेठ व न्यु तापडीया नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.

 दरम्यान काल रात्री (दि.13) रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

36 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून चार, आयकॉन हॉस्पीटल येथून पाच,  हॉटेल स्कायलार्क येथून दोन, सूर्यचंद्रा हॉस्पीटल येथून दोन, ओझोन हॉस्पीटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, उपजिल्हा रुग्णालय येथून एक, अकोला अकॅसिडेंट येथून तीन, अवघाते हॉस्पिटल येथून एक, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले 13 अशा एकूण 36 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

593 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 11040(8889+1974+177) आहे. त्यातील 326 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 10121 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 593  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ