ग्रामपंचायत मतमोजणीसाठी अकोट शहरातील पर्यायी मार्गाने वाहतूक

 अकोला,दि.17(जिमाका)- ग्रामपंचायत निवडणूक 2020-21 ची मतमोजणी अकोट येथील कास्तकार भवन, कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सोमवार (दि.18) रोजी सकाळी सातवाजेपासून सुरु होणार आहे. मतमोजणीच्या वेळी या ठिकाणी कोणताही अनूचित प्रकार घडू नये याकरिता अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील पोपटखेड रोडवरील पुरोहीत हॉटेल ते रशीद मेंबर यांचे सॉ मिलपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक वळविण्यात  येत आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमीत केलेल्या आदेशानुसार सोमवार (दि.18) रोजी सकाळी सात वाजेपासून ते रात्री आठवाजेपर्यंत आशियाना हॉटेल जवळून- कॅनरा बँक- अंबिकानगर - रशीद सॉ मील जवळून - पोपटखेड तसेच हिवरखेड-वॉटर सप्लाय ऑफिस- गाझी, प्लॉट-कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागून बोरडी रस्ता-पोपटखेड या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम