रस्ते सुरक्षा अभियानानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा

 अकोला,दि.१९ (जिमाका)- ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त अकोला जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी कळविले आहे.

 उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  ‘ रस्त्यावरील अपघातः समस्या व उपाययोजना’ या विषयावर ही निबंध स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत वय वर्षे १२ ते १६ या वयोगटातील  शालेय विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. इच्छुक स्पर्धकांनी आपला निबंध लिहुन शुक्रवार दि.५ फेब्रुवारी पर्यंत  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालय, रिजनल वर्कशॉप, मंगरुळपीर रोड, खडकी बु. अकोला येथे जमा करावे. या स्पर्धेतील विजेत्यांस प्रथम क्रमांक एक हजार रुपये, द्वितीय क्रमांक ७०० रुपये, तृतीय क्रमांक ५०० रुपये  बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी आपल्या निबंधावर आपले संपुर्ण नाव, शाळेचे नाव, वय इ. नोंद करावी. जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांनी  सहभागी व्हावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ