१२३० अहवाल प्राप्त, ५० पॉझिटीव्ह, १८ डिस्चार्ज, एक मयत

 अकोला,दि.२४ (जिमाका)-आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्गत तपासणीचे १२३० अहवाल प्राप्त झाले. त्यातील ११८० अहवाल निगेटीव्ह तर ५०  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. १८ जणांना  डिस्चार्ज देण्यात आला, तर एका रुग्णाचा उपचरा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.२3) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते.

 त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्हअहवालांची एकूण  संख्या ११३९१(९२००+२०१४+१७७)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ८२५०२ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ८०७५६ फेरतपासणीचे ३२१  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १४२५ नमुने होते. आजपर्यंत एकूण ८२४३३ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या  ७३२३३  आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

५० पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात ५० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी १९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १० महिला व नऊ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मलकापूर येथील पाच, गोरक्षण रोड येथील तीन उर्वरित जि.प. प्रायमरी उमरी, कालवडी ता. अकोट, खदान, दहिगाव ता. तेल्हारा,  बोरगाव मंजू, परिवार कॉलनी, अकोट, बोरमाली, जि.प. स्कूल कौलखेड, जि.प. कासली बु. व बाळापूर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.

 तर आज सायंकाळी ३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १० महिला व २१ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील स्वालंबी नगर, मलकापूर व खडकी येथील प्रत्येकी तीन, अकोट, कौलखेड व गीता नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित कवठा, घोडेगाव ता. तेल्हारा, मालेगाव ता. तेल्हारा, अकोला जहागीर, गोकुल कॉलनी, शास्त्री नगर, अनंत नगर, तोष्णीवाल लेआऊट, बालाजी नगर, अपा मंगल कार्यालय जवळ, सिंधी कॅम्प, बोरगाव खुर्द, राजनखेड ता. बार्शीटाकळी, गजानन नगर, गोरक्षण रोड व जठारपेठ येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. 

दरम्यान काल रात्री (दि.२३) रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

एकाचा मृत्यू

दरम्यान आज  एका खाजगी रुग्णालया एका ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण लाडपूर कांजरा ता.मूर्तिजापूर येथील रहिवासी असून त्यांचा आज सकाळी उपचारा दरम्यान मुत्यू झाला त्यांना दि.१८ रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

१८ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून नऊ, आयकॉन हॉस्पीटल येथून एक, स्कायलार्क हॉटेल येथून दोन, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले सहा अशा एकूण १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

६५७ जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या ११३९१(९२००+२०१४+१७७) आहे. त्यातील ३३२ जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  १०४०२ संख्या  आहे. तर सद्यस्थितीत ६५७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ