आज रोजगार हमी योजनेसबंधी आढावा बैठक संपन्न

 



अकोला,दि.14 (जिमाका)- आज लोकशाही सभागृह  अकोला येथे उपायुक्त रोहयो अमरावती  धनंजय गोगटे यांच्या अध्यक्षतेखाली अकोला जिल्ह्याची आढावा सभा संपन्न झाली.

या सभेस सर्व जिल्ह्यातील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी] डेटा एंट्री ऑपरेटर व तांत्रिक अधिकारी यांचा आढावा घेण्यात आला. रोजगार हमी योजनेचीची अंमलबजावणी संदर्भात सविस्तर तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. यामध्ये रिजेक्ट ट्रांजेक्शन, delay competition, PFMS validation, secure प्रणालीतील कामे, मजुरांची मजुरी वेळेवर देणेबाबतचा तसेच अपूर्ण कामे मुदतीत करण्याबाबतचाही आढावा घेण्यात आला.

यावेळी  उपजिल्हाधिकारी रोहयो  बाबासाहेब गाढवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा  राहुल शेळके, दुधे,  आयुक्त  कार्यालयातील उपमुख्यकार्यकारी अधिकारी  मधुकर वासनिक, रोजगार हमी योजना शाखेतील लेखा अधिकारी  मिलिंद साधू, नायब तहसीलदार श्रीमती स्नेहा गिरीगोसावी, शाखा अभियंता गुंज राठोड, जिल्हा समन्वयक आशिष उमाळे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ