जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी
अकोला,दि.२३ (जिमाका)- येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी लोकशाही सभागृहात नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, संतोष कानडे, अभय राठोड, निलेश दामोदर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी- अधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा