रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 87 चाचण्यात चार पॉझिटीव्ह

अकोला,दि. 28(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 87 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात अकोट येथे चार, बाळापूर येथे चार, तेल्हारा येथे 11, मुर्तिजापूर येथे दोन, अकोला आयएमए येथे सात, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 21 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर हेगडेवार लॅब येथे दोन चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 36 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला.  अशा एकूण 87 चाचण्यांमधून चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 31 हजार 639 चाचण्या झाल्या पैकी 2087 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ