‘महाडीबीटी’ बाबत शिष्यवृत्ती पथकाच्या तालुकानिहाय कार्यशाळा

 अकोला,दि.२१ (जिमाका)- माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसीत केलेल्या ‘महाडीबीटी’ या प्रणालीमार्फत  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत  विविध शिष्यवृत्ती , विद्यावेतन इ. विद्यार्थ्यांच्या थेट बॅंक खात्यावर वर्ग केले जातात. या संदर्भात प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी शिष्यवृत्ती पथकाच्या तालुकानिहाय कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण माया केदार यांनी दिली आहे.

कार्यशाळांचे वेळापत्रक याप्रमाणे-

मंगळवार दि.२ फेब्रुवारी- गुलामनबी आझाद कला, वाणिज्य महाविद्यालय,बार्शी टाकळी.

 बुधवार दि. ३ फेब्रुवारी- डॉ. वंदनाताई जगन्नाथराव ढोणे ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय, पातूर.

 गुरुवार दि.४ फेब्रुवारी - डॉ. मनोरमा पुंडकर कला व वाणिज्य महाविद्यालय,बाळापूर.

मंगळवार दि. ९ फेब्रुवारी- श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, दर्यापूर रोड,अकोट. 

बुधवार दि.१० फेब्रुवारी -  कै. नर्मदाबाई बोडखे अध्यापक महाविद्यालय,तेल्हारा. 

गुरुवार दि.११ फेब्रुवारी- श्री.संत गाडगे महाराज महाविद्यालय, कारंजा रोड, मुर्तिजापूर.

मंगळवार दि.१६ फेब्रुवारी - श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिवाजी पार्क जवळ, अकोला. या सर्व ठिकाणी सकाळी ११ वाजता होणार आहे, असे सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ