रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः४७ चाचण्यात शून्य पॉझिटीव्ह

 अकोला,दि. २ (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या ७ चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात अकोट येथे नऊ, बार्शीटाकळी येथे एक, तेल्हारा येथे तीन,  मुर्तिजापूर येथे तीन, अकोला आयएमए येथे पाच, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या २२ चाचण्या झाल्या, आणि डॉ. हेडगेवार लॅब येथे चार जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. अशा एकूण ७ चाचण्यांमधून कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ३१ हजार २८५ चाचण्या झाल्या पैकी २०६३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ