रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 64 चाचण्यांत आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह

अकोला,दि. 13(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 64 चाचण्या झाल्या त्यात  आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात अकोट येथे दोन, बाळापूर येथे एक, बार्शीटाकळी येथे दोन, आरोग्य कर्मचारी येथे एक, मुर्तिजापूर येथे नऊ चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर तेल्हारा येथे चार चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 36 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात तिघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, हेगडेवार लॅब येथे नऊ चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले,  अशा एकूण 64 चाचण्यांमधून आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 30 हजार 610 चाचण्या झाल्या पैकी 2024 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ