रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 85 चाचण्यांत पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
अकोला,दि. 15(जिमाका)-
कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड
ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 85 चाचण्या झाल्या
त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,अशी माहिती
निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात अकोट येथे पाच, अकोला आयएमए येथे सहा, आरोग्य कर्मचारी येथे 29 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला
नाही. तर तेल्हारा येथे 15 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयात 27 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, हेगडेवार लॅब येथे तीन
चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशा एकूण 85 चाचण्यांमधून पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
आले. आतापर्यंत जिल्ह्यात 30 हजार 807
चाचण्या झाल्या पैकी 2038 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा