599 अहवाल प्राप्त, 18 पॉझिटीव्ह, 27 डिस्चार्ज


अकोला,दि.26 (जिमाका)-आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्गत तपासणीचे 599 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 581 अहवाल निगेटीव्ह तर 18  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. 27 जणांना  डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.25) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आले होते.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्हअहवालांची एकूण  संख्या 11428(9030+2021+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 83161 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 81407 फेरतपासणीचे 326  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1428 नमुने होते. आजपर्यंत एकूण 83111  अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 74081 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

18 पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात 18 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एक महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. त्यातील दगड पारवा, खेडकर नगर, रामदास पेठमलकापूर व तापडीया नगर येथील प्रत्येकी  एक प्रमाणे रहिवासी आहे.   तर आज सायंकाळी 13 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मूर्तिजापूर येथील चार, बार्शीटाकली येथील दोन, तर उर्वरित राऊतवाडी, शिवार, सिंधी कॅम्प, खानापूर ता. अकोट, अडगाव ता. तेल्हारा, महानगर पालिका शाळा न.1 व अकोट फाईल येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान काल रात्री (दि. 25) रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

27 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर आयकॉन हॉस्पीटल येथून चार, हॉटेल रिजेन्सी येथून चार, बिहाडे हॉस्पिटल येथून दोन, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून एक, स्कायलार्क हॉटेल येथून तीन, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले 13 अशा एकूण 27 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे

637 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 11428(9030+2021+177)  आहे. त्यातील 334 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 10457 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 637 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ