पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जिल्हा दौरा

 अकोला,दि.२४ (जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे सोमवार दि.२५ व मंगळवार दि.२६ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

सोमवार दि. २५ रोजी  सकाळी ११ वा. शासकीय विश्रामगृह अकोला येथे आगम व राखीव, सकाळी साडेअकरा वा. जिल्हा नियोजन कार्यकारी समिती आढावा बैठक, स्थळ- नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला. सायं. पावणे सहा वा.  शहीद जवान सुरेश शालीग्राम डांगटे, रा. देशमुख फैल अकोला यांच्या कुटुंबियांस भेट, सायं. साडेसहा वा.  मौजे चांदूर ता. अकोला कडे प्रयाण. सायं. पावणे सात वा. सिरम इन्स्टिट्युट पुणे येथील आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले स्व. महेंद्र प्रकाश इंगळे रा. चांदूर यांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट, सायं. पावणे आठ वा. मौजे डोंगरगाव ता. अकोला कडे प्रयाण, रात्री आठ वा. पाच मि. नी. शहीद महादेव नामदेव तायडे, डोंगरगाव यांच्या कुटुंबियांस भेट,  रात्री नऊ वा. पाच मि. नी. श्याम शंकरराव देशमुख रा. मौजे डोंगरगाव यांच्याकडे सदिच्छा भेट. रात्री सव्वा दहा वा. अकोलाकडे प्रयाण व साडेदहा वा. शासकीय विश्रामगृह अकोला येथे मुक्काम.

मंगळवार दि.२६ रोजी सकाळी  नऊ वा. दहा मि. नी. लालबहादुर शास्त्री स्टेडियमकडे प्रयाण, सकाळी सव्वा नऊ वा.  लालबहादूर शास्त्री स्टेडियम येथे  प्रजासत्ताक दिन सोहळ्यास  शासकीय ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थिती., पावणे दहा वा. स्वातंत्र्य सैनिक , सन्मानीय लोक प्रतिनिधी, उपस्थित नागरिकांच्या भेटी. सकाळी सव्वा दहा वा. डिजीटल राहुटी कार्यक्रमाचे उद्घाटन, स्थळ- लोकशाही सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला. सकाळी साडेदहा वा. श्री शिवाजी महाविद्यालय, अकोलाकडे प्रयाण, सकाळी १० वा. ४० मि. नी.  नारीशक्ती सेवा फाऊंडेशनच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती, स्थळ- श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला. सकाळी ११ वा. २० मि. नी बेघर निवारा, अकोट फैल, अकोला येथे भेट, दुपारी १२ वा. २० मि. नी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत कोटेशन वाटप कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ- विद्युत भवन,अकोला. दुपारी एक वा.  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी  विद्यापिठाच्या  अचलपूर प्रक्षेत्र येथे राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्प, योजनांचे नियोजन व अंमलबजावणीबाबत सभा, स्थळ- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, दुपारी दोन वा. कुरणखेड ता. अकोला कडे प्रयाण,  दुपारी दोन वा. २० मि. नी कुरणखेड ता. अकोला येथे शहीद जवान  विनोद मोहोड यांच्या कुटुंबियास भेट, दुपारी तीन वा. २० मि. नी. मौजे माना, ता. मुर्तिजापुरकडे प्रयाण, दुपारी तीन वा. ५० मि. नी  माना ता. मुर्तिजापूर येथे शहीद जवान संजू सुरेश खंडारे यांच्या कुटुंबियास भेट,   दुपारी चार वा.५० मिऩी जामठी बु. ता. मुर्तिजापूर कडे प्रयाण, दुपारी पाच वा. १० मि. नी.  जामठी बु. ता. मुर्तिजापूर येथे  शहीद जवान विजय बापुराव तायडे यांच्या कुटुंबियास भेट, सायं. पाच वा. ४५ मि. नी. मौजे मधापुरी ता. मुर्तिजापूर कडे प्रयाण, सायं. सहा वा. मौजे मधापुरी ता. मुर्तिजापूर येथे शहीद जवान  प्रल्हाद भोलाजी साव यांच्या कुटुंबियास भेट व नंतर अमरावतीमार्गे कुरळपुर्णा कडे प्रयाण.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ