नारी शक्ती पुरस्कार; रविवार (दि.31) पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करा

 


अकोला,दि.29 (जिमाका)- केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या नारी शक्ती पुरस्काराकरिता कोणतीही व्यक्ती किवा संस्था आपले नामांकन www.wcd.nic.in www.narishaktiPuraskar.wcd.gov.in  या वेब साईडवर ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. पुरस्कारासाठी अर्ज व नामनिर्देशन रविवार (दि.31) पर्यंत करावी. या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार  नाही. याबाबत सविस्तर माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. वैयक्तीक पुरस्काराकरिता अर्जदाराचे वय हे पुरस्कार वर्षाच्या 1 नोव्हेंबर रोजी 25 वर्ष पूर्ण केलेले असावे, अर्जदार संस्था असेल तर संबधित क्षेत्रात किमान पाच वर्ष कार्यरत असावे. अर्जदाराने हा पुरस्कार किवा स्त्री पुरस्कार यापुर्वी प्राप्त केलेला नसावा. दरवर्षी 20 फेब्रुवारी रोजी पुरस्कार प्रदान केल्या जातो. तर या पुरस्कारासाठी नामांकन अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ