73 अहवाल प्राप्त, 12 पॉझिटीव्ह, 44 डिस्चार्ज, एक मयत
अकोला,दि.11 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्गत तपासणीचे 73 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 61 अहवाल निगेटीव्ह तर 12 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. 44 जणांना डिस्चार्ज देण्यात आले. तसेच आज शासकीय वैद्यकीय महाविद्यलयात उपचार घेतांना एका महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्याल याने कळविले आहे.
त्याच प्रमाणे काल
(दि.10) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची
एकूण संख्या १०९३५(८८०१+१९५७+१७७) झाली आहे, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा
रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 74791 जणांचे अहवाल आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 73105 फेरतपासणीचे 298 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1388 नमुने होते. आजपर्यंत एकूण 74645 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण
निगेटीव्ह अहवालांची संख्या 65844 तर पॉझिटीव्ह अहवाल १०९३५(८८०१+१९५७+१७७)आहेत, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 12
पॉझिटिव्ह
आज दिवसभरात १२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच महिला व सात पुरुषांचा समावेश आहे.
त्यातील रामदास पेठ, तापडीया नगर व आदर्श कॉलनी
येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित रणपिसे नगर, गीता नगर, गाडगे नगर, डाबकी
रोड, अकोट व दुबेवाडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी
आहे. आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.
दरम्यान काल रात्री (दि.१०) रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल
संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
४४ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ११, आयकॉन हॉस्पीटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून दोन,
ओझोन हॉस्पीटल येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल
येथून चार, अकोला अक्सीडेंट येथून दोन, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले २२ अशा एकूण ४४ जणांना
डिस्चार्ज देण्यात आला आहे
एकाचा मृत्यू
दरम्यान आज एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला. ही
५५ वर्षीय महिला गाडगे नगर,
अकोला येथील रहिवासी असून त्यांना दि.८ रोजी दाखल करण्यात आले होते, आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला, अशी
माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
593
रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण
पॉझिटीव्ह अहवालांची संख्या १०९३५(८८०१+१९५७+१७७)आहे. त्यातील 325 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण
व्यक्तींची 10017 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 593 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा