वृद्ध साहित्यीक व कलावंत यांना मानधन योजनेतंर्गत प्रस्ताव आमंत्रीत

   अकोला,दि. 12 (जिमाका)-  वृद्ध साहित्यीक व कलावंत यांना मानधन या योजनेंतर्गत सन 2020-21 या वर्षाकरीता प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या योजनेअतंर्गत साहित्य व कला या क्षेत्रात ज्यांनी मोलाची भर घातली आहे, अशी व्यक्ती,  कला व वाडमय क्षेत्रात  ज्यांनी किमान 15त 20 वर्षे इत्यक्या प्रदिर्घ काळासाठी महत्वपुर्ण कामगिरी केली अशा व्यक्ती, ज्या स्त्री/पुरूष कलाकाराचे व साहित्यीकांचे वय 50 वर्षापेक्षा जास्त आहे अशा व्यक्ती , जे साहित्यीक  व कलावंत अर्धांगवायू, क्षयरोग ,कृष्ठरोग, कर्करोग या रोगांनी आजारी असतील तसेच ज्यांना 40 % पेक्षा जास्त शारिरीक व्यंग असेल किंवा अपघाताने40 % पेक्षा जास्त अपंगत्व आले असेल व त्यामुळे स्वत:ता व्यवसाय करू शकत नसतील असे साहित्यीक व कलावंत यांच्यासाठी वयाची अट शिथील करण्यात येईल, ज्या साहित्यीक कलावंताच्या सर्व मार्गाने मिळून वार्षिक उत्पन्न रू. 48000/- पेक्षा जास्त नाही, वयाने वडील असणा-या विधवा/ परितक्त्या  वृद्ध साहित्यीक व कलावंत यांना मानधन देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल.

याप्रमाणे निकषांची पुर्तता करणा-या वृद्ध साहित्यीक व कलावतांनी आपले परिपुर्ण प्रस्ताव संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे 31 जानेवारी 2021 पुर्वी सादर करावेत असे आवाहन जिल्हा  समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांनी केले आहे.

अर्जासोबत लावावयाची कागदपत्रे- वृद्ध साहित्यीक व कलावंत पती/पत्नीचा एकत्रीत पासपोर्ट आकाराचा फोटो सक्षम अधिकारी यांनी सांक्षाकित केलेला असावा, अर्जदाराचा बँक खाते क्रमांक व बँकेचा IFSC  कोड क्रमांक( त्यांच्या सांक्षाकित प्रतिसह),  जन्मतारखेचा दाखला, महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला (ग्रामपंचायत/नगर पंचायत/नगर परिषद/ महानगर पालिका यांच्या  सक्षम अधिका-यांनी रहिवाशी असल्याबाबतचा दिलेला दाखला), तहसिलदार यांचा उत्पन्नाचा दाखला , रोगाबाबत/ अपंगत्वाबाबत जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र ,  इतर शासकीय योजनांचा लाभ घेत नसल्याबाबतचे नोटरी केलेल्या  प्रतिज्ञापत्राची प्रत, अर्जामध्ये नमुद इतर कलेसंबधी कागदपत्रे, आधारकार्ड सत्यप्रत.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना