ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतदानाच्या दिवशी सुट्टी व सवलत

             अकोला,दि.13 (जिमाका)- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूका 2020-2021  करीता शुक्रवार (दि.15) रोजी मतदान होणार आहे. मतदानाचे दिवशी मुक्त,निर्भय व पारदर्शक वातावरणांत निवडणूका पार पाडण्याच्या दृष्टीने ठेवणे मा.राज्य निवडणूक आयोगाने खालीलप्रमाणे निर्देश निर्गमित केलेले आहे.

            उपरोक्त निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधीत निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने,आस्थापना , निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, व्यापार, औद्योगीक  उपक्रम किंवा इतर आस्थापना यामधील कामगारांना मतदानाच्या दिवशी (दि.15) रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी जाहीर करावी. निवडणूक होणा-या ज्या ग्रामपंचायतींच्या  लगतच्या क्षेत्रात औद्योगीक वसाहती (MIDC) तसेच महानगर पालिकेसारख्या  मोठया नागरी वसाहती वसलेल्या आहेत, अशा ठिकाणी नोकरी निमीत्ताने कामास येणा-या संबंधीत ग्रामपंचायतीं मधील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा या दृष्टीने  अशा मतदारांना उक्त नमुद केलेल्या मतदानाच्या दिवशी भरपगारी  सुट्टी / विशेष सवलत देण्यात यावी.  शहरी भागात किंवा निवडणूका नसलेल्या भागातील दुकाने दुकाने/कंपन्या/वाणिज्यीक आस्थापना बंद ठेवण्याची आवश्यकता नाही.

            जिल्ह्यातील  निवडणूक क्षेत्रातील  मतदारांना  मतदानाचे दिवशी  मतदानाचा हक्क बजावता यावा, या करीता  मतदानाचे दिवशी शुक्रवार (दि.15)  रोजी सुट्टी जाहिर करणे/ सवलत देणे बाबतचे आदेश जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

            आयोगाचे आदेशांचे पालन  न केल्यास संबंधीत  आस्थापनांविरूद्ध आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ