97 अहवाल प्राप्त, 30 पॉझिटीव्ह, 38 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

 

अकोला,दि.13 (जिमाका)-आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्गत तपासणीचे 297 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 267 अहवाल निगेटीव्ह तर 30 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. तर 38 जणांना  डिस्चार्ज देण्यात आले. तसेच आज एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्याल  याने कळविले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.12) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 11006(8863+1966+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 75575 जणांचे  अहवाल आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 73886 फेरतपासणीचे 300 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1389 नमुने होते. आजपर्यंत एकूण 75451 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या  66588 तर पॉझिटीव्ह अहवाल  11006(8863+1966+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

 आज 30 पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात   30 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 30 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 15 महिला व 15 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील  आदर्श कॉलनी येथील चार, मित्रा नगर व कमल टॉवर जठारपेठ येथील प्रत्येकी तीन, मोठी उमरी, जठारपेठ व आळशी प्लॉट येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित मलकापूर, जुने शहर, जांवसु ता. बार्शीटाकळी, धमानधरी ता. बार्शीटाकळी, गोरक्षण रोड, बेसेन रिंगरोड, पाथर्डी ता. तेल्हारा, शंकर रोड, साने गुरुजी नगर, कैलास नगर, तरोडा ता. अकोट, जवाहर नगर, न्यू महसूल कॉलनी व न्यू तापडीया नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.

 दरम्यान काल रात्री (दि.12) रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

38 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून पाच, आयकॉन हॉस्पीटल येथून एक,  हॉटेल स्कायलार्क येथून दोन, सूर्यचंद्रा हॉस्पीटल येथून एक, ओझोन हॉस्पीटल येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले 25 अशा एकूण 38 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

   एकाचा मृत्यू

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण  गुरुदत्त नगर, डाबकी रोड येथील 83 वर्षीय पुरुषाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला. त्यांना 5 जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.

595 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 11006(8863+1966+177) आहे. त्यातील 326 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 10085 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 595  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम