292 अहवाल प्राप्त, 28 पॉझिटीव्ह, 34 डिस्चार्ज


अकोला,दि.17(जिमाका)-आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्गत तपासणीचे 292 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 264 अहवाल निगेटीव्ह तर 28 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. तर 34 जणांना  डिस्चार्ज देण्यात आले असल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्याल  याने कळविले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.16) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 11148(8980+1991+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 77181  जणांचे  अहवाल आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 75476 फेरतपासणीचे 307 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1398 नमुने होते. आजपर्यंत एकूण 77085 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या  68105  तर पॉझिटीव्ह अहवाल  11148(8980+1991+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

 आज 28 पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात   28 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 28 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 12 महिला व 16 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील डाबकी रोड येथील चार, जठारपेठ, गीता नगर व ज्योती नगर येथील प्रत्येकी दोन, उर्वरित बार्शिटाकळी, माना, राजनखेड, अकोट, बोर्डी ता. अकोट, विवरा ता. पातुर, खदान, तुकाराम चौक, बाळापुर, किर्ती नगर, श्रद्धा नगर ,सिंधी कॉलनी, तोष्णीवाल लेआऊट, कपिलवास्तु नगर, जुने शहर, कौलखेड ,बैदपूरा व अकोट फाइल येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.

 दरम्यान काल रात्री (दि.16) रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

34 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 12, आयकॉन हॉस्पीटल येथून चारसूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून पाचबिहाडे हॉस्पिटल येथून आठ, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले दोन अशा एकूण 34 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

606 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 11148(8980+1991+177) आहे. त्यातील 328 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 10214 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 606  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ